महाराष्ट्रातील धुळे (Dhule Zilla Parishad 2021), नंदुरबार (Nandurbar Zilla Parishad 2021), अकोला (Akola Zilla Parishad 2021), वाशिम (Washim Zilla Parishad 2021) आणि नागपूर (Nagpur Zilla Parishad 2021) या जिल्ह्यातील ओबीसीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होते. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यामधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली आहे. तर, पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका तेथील कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले आहे.
न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा, तसेच त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे. तर, 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मदान यांनी दिली आहे. हे देखील वाचा- पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाचा पदभार घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे
ट्वीट-
न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा, तसेच त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलैला मतदान; तर २० जुलैला मतमोजणी होईल- राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती pic.twitter.com/oGSVyjPR26
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 22, 2021
कोरोना महामारीमुळे अनेक राज्यातील अनेक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या पाच जिल्ह्यांनी लेव्हल-1 मध्ये प्रेवश केला आहे. यामुळे या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. परंतु, पालघर जिल्ह्याचा अद्यापही लेव्हल-3 मध्ये समावेश आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील परिस्थिती सुधारल्यानंतर येथे निवडणुका घेण्यात येणार आहेत.