Amit Shah's Bag Check By EC: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकाऱ्यांनी हिंगोली (Hingoli) येथे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या बॅगची तपासणी केली. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बॅगेच्या तपासावरून राजकीय वाद सुरू असताना ही घटना घडली आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात आणि मंगळवारी लातूरमध्ये उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली होती. दरम्यान, अमित शाह यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर बॅग तपासणीसंदर्भात माहिती दिली आहे.
यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करताना अमित शहा यांनी म्हटलं आहे की, 'आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निरोगी निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. तसेच निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो. आपण सर्वांनी निरोगी निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिले पाहिजे आणि भारताला जगातील सर्वात मजबूत लोकशाही ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे.' (हेही वाचा -EC Officials Check Eknath Shinde's Bag: उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता निवडणूक आयोगाने तपासली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग (Video))
हिंगोलीमध्ये अमित शहांच्या बॅगची तपासणी, पहा व्हिडिओ -
आज महाराष्ट्र की हिंगोली विधानसभा में चुनाव प्रचार के दौरान चुनाव आयोग के अधिकारियों के द्वारा मेरे हेलिकॉप्टर की जाँच की गई।
भाजपा निष्पक्ष चुनाव और स्वस्थ चुनाव प्रणाली में विश्वास रखती है और माननीय चुनाव आयोग द्वारा बनाए गए सभी नियमों का पालन करती है।
एक स्वस्थ चुनाव… pic.twitter.com/70gjuH2ZfT
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2024
निवडणूक आयोगाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी -
दरम्यान, गुरुवारी भाजपच्या महाराष्ट्र युनिटने बुधवारी X वर एक व्हिडिओ पोस्ट केला होती, ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासताना दिसत आहेत. केवळ दिखाव्यासाठी संविधानाचा आधार घेणे पुरेसे नाही आणि प्रत्येकाने घटनात्मक व्यवस्थेचेही पालन केले पाहिजे, असे भाजपने म्हटलं होतं. काही नेत्यांना ‘नाटक’ करण्याची सवय आहे, असेही भाजपने पोस्टमध्ये म्हटलं होतं.