Coronavirus | Image Used For Representational Purpose | File Image

महाराष्ट्रामध्ये आता दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. दरम्यान रूग्णांवर मुंबईमध्ये विविध सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढत असताना आता स्पेनमधून परतलेल्या एका वयोवृद्ध जोडप्यानी त्यांचा कोरोना व्हायरसची सुरू असलेल्या सामन्याची कहानी शेअर करताना मुंबई महानगर पालिका आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेचे आभार मानले आहेत. दरम्यान बीएमसीच्या ट्वीटर हॅन्डलवरून त्यांची हकिकत शेअर करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसशी सामना करणार्‍यांचा आकडा 38 वर पोहचला आहे. या राज्यातील कोरोनाग्रस्तांसोबत विलीनीकरण कक्षात डॉक्टरांच्या निगराणीखाली असलेल्या रूग्णांपैकी पहा मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये असलेले दांम्पत्य नेमके काय सांगत आहेत. Coronavirus In Maharashtra: मुंबई, नवी मुंबई सह यवतमाळ मध्ये आढळले कोरोनाचे 5 नवे रुग्ण; महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 38

दरम्यान बीएमसीच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार स्पेन, बार्सिलोना येथे हे वयोवृद्ध जोडपे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. नातवाला 8 वर्षांनी भेटण्याचा आनंद खास होता. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत असल्याने त्यांच्याही मनात भीती वाढत होती. काही दिवसांचा स्पेन मधील मुक्काम वाढवल्यानंतर त्यांनी भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पुरेशी औषधं त्यांच्यासोबतीला होती. दिवसेंदिवस स्पेनमधील स्थिती खराब होत होती. त्यामुळे एम्बेसीमधूनदेखील शक्य तितक्या लवकर स्पेन सोडण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र यामध्ये विलगीकरण कक्षामध्ये राहणं हे अटळ होतं. अशामध्येच विमानसेवा विस्कळीत असल्याच्या बातम्यादेखील मिळाल्या. त्यानंतर आमचा प्रवास अधिकच बिकट बनत गेला. आम्ही बार्सोलोना- अबुधाबी - मुंबई असा प्रवास करून भारतात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालो.

मुंबईमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्यांपैकी आम्ही सुरूवातीचे काही लोक होतो. अशी महिती या जोडप्याने दिली आहे. 'आमच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं नसतील. अशी आम्हांला खात्री होती. नंतर आम्हांला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागणार याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आमचं वय आम्हांला प्रामुख्याने फॉर्मवर ठळक नमूद करायचे होते. त्यानुसार 60 वर्षांवरील लोकांना वेगळी रांग होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने आम्हांला विविध चेक आऊट्स पॉंईटवर मदत करून खबरदारीचा उपाय म्हणून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवत असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हायफाय, सेट बॉक्सची सोय करण्यात आली. सेव्हन हिल्स सारख्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्याने इथे किती रूग्ण आहेत, याचे किती पैसे होणार हे एक ना हजार प्रश्न समोर आले होते. मात्र पालिकेच्या कर्मचार्‍यांनी तुम्ही रूग्ण नाही आमचे गेस्ट आहात असे म्हणत त्यांना दिलासा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

BMC Tweet  

सध्या मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार्‍या अनेक लोकांना अशाच प्रकारे पालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यासाठी मुंबई प्रशासनाकडून खास सोय देखील करण्यात आली आहे.