Coronavirus In Maharashtra: मुंबई, नवी मुंबई सह यवतमाळ मध्ये आढळले कोरोनाचे 5 नवे रुग्ण; महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 38
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरसचे 33 रुग्ण होते. मात्र यात नव्या 5 रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 38 झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि नवी मुंबईत कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर यवतमाळ येथे एक रुग्ण सापडला आहे. पुणे 16, मुंबई 8, ठाणे 1, कल्याण 1, नवी मुंबई 2, पनवेल 1, नागपूर 4, अहमदनगर 1 , यवतमाळ 3, औरंगाबाद 1 असा शहरानुसार रुग्णांचा आकडा आहे. म्हणजेच राज्यात एकूण कोरोनाचे एकूण 38 रुग्ण आहेत. तरी नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आले आहे.

यवतमाळ येथे कोरोना बाधित एक रुग्ण आढळून आला आहे. तो दुबईहून परतला होता.

ANI Tweet:

मुंबई आणि नवी मुंबईत कोरोनाचे चार नवे रुग्ण सापडले आहेत.

ANI Tweet:

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. तरी देखील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मुख्य सचिवांसह जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेणार आहेत. (कोरोना व्हायरस जनजागृती करणारे होर्डिंग्स लावण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आदेश; नियम न पाळण्यास BMC करणार कठोर कारवाई)

ANI Tweet:

दिवसागणित राज्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहता नागरिक चिंतेत आहेत. कोरोनाग्रस्तांचा हा वाढता आकडा लक्षात घेऊन कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.