Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Sanjay Raut On Ajit Pawar: उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची जागा घेतील, असा दावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केला. एकनाथ शिंदे हे विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईत अपात्र ठरतील. त्यामुळे ते लवकरच घरी जातील. शिंदे यांच्यासोबत 16 आमारही अपत्र ठरतील, असे राऊत म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आज मी कॅमेऱ्यासमोर हे सांगत आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार आहेत. एकनाथ शिंदे यांना हटवले जात आहे. एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांना अपात्र ठरवले जाणार आहे. भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला फोडत आहे पण याचा त्यांना अजिबात फायदा होणार नाही. महाराष्ट्रात आम्ही 2024 ची निवडणूक एकत्र लढणार आहोत, असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra NCP Crisis: अजित पवार यांच्या बंडामुळे आकडे बदलले, जाणून कोणासोबत किती आमदार; विधिमंडळातील पक्षीय बलाबल)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टवादी काँग्रेस असा आरोप केला, राष्ट्रवादीचे नेते हे भ्रष्टाचारात गुंतल्याचे म्हटले होते. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेच नेते थेट भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होत आहेत. हे धक्कादायक आहे, असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार कराडकडे रवाना, अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात उलथापालत)

व्हिडिओ

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या लोकांना परत घेणार का? असे विचारले असता अजिबात नाही. त्यांचा विषय संपलेला आहे. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरु झाली आहे असे सांगतानाच संजय राऊत पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेचे बंडखोर आमदार लवकरच अपात्र ठरतील आणि अजित पवारांचा राज्याभिषेक होईल,’ असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. या नवीन घडामोडी राज्यातील जनतेला पटणार नाही. राज्याला अशी कोणतीही राजकीय परंपरा नव्हती आणि त्याला लोकांचा कधीही पाठिंबा मिळणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले.