Suicide | (Photo Credits: unsplash.com)

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने आपले जीवन संपवल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. एकच मिशन, मराठा आरक्षण..., मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने मी ही टोकाची भूमिका घेत आहे.. अशी चिठ्ठी लिहून फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील अठरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. गजानन नारायण जाधव हा अठरा वर्षे तरुण इयत्ता बारावीच्या वर्गात तालुक्यातील निधोना येथील प्रभात हायस्कूल विद्यालयात शिकत होता. (हेही वाचा - IIT Delhi च्या हॉस्टेल मध्ये नाशिकचा विद्यार्थी आढळला मृतावस्थेमध्ये; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज)

गजानन नारायण जाधवच्या घरचे हालाकीची परिस्थिती असल्यामुळे आपण शिक्षण घेऊन वडिलांच्या नावावर असलेले कर्ज फेडण्याचा मानस त्याचा होता. मात्र मागील गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या आरक्षणात सरकारी ठोस भूमिका घेत नसल्याने आपल्याला आरक्षण नाही आणि मग आता नोकरी कशी मिळणार..? याची चिंता त्याला सतावत होती.

गजानन नारायण जाधव याने गणोरी येथे गट नंबर 191 येथील शेतात जनावरांच्या गोठ्यात जनावरे बांधतात त्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान त्याचा लहान भाऊ कार्तिक जाधव याने पाहिल्यानंतर त्याने आरडाओरड केली. त्यानंतर सदरची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये आत्महत्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली.