Dawood Ibrahim, Ejaz Lakdawala | (Photo credit: archived, edited, symbolic images)

आमचा प्लान यशस्वी झाला असता तर, दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim आज जीवंत नसता. दाऊदचा गेम आम्ही दरग्याबाहेरच केला असता पण नेपाळचा खासदार मिर्झा दिलशाद बेग (Mirza Dilshad Beg) याने त्याला ऐनवेळी टीप देऊन घोळ केला, अशी माहिती गँगस्टर एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याने मुंबई पोलिसांना दिली आहे. एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. तो कुख्यात छोटा राजन याचा हस्तक होता. ताब्यात घेतल्यापासून मुंबई पोलीस (Mumbai Police) लकडावाला याची कसून चौकशी करत आहेत.

एजाज लकडावाला हा सुरुवातीला दाऊद इब्राहिम याच्या टोळीत होता. मात्र, पुढे काही कारणांनी बिनसल्यानंतर तो छोटा राजन गटासाठी काम करु लागला. छोटा राजन याला अटक झाल्यानंतर त्याच्या टोळीतील अनेकांना आता अटक करण्यात येत आहे. एजाज लकडावाला यालाही मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन शाखेने पाटणा येथून अटक करण्यात आली. 8 जानेवारी या दिवशी लकडावाला याला अटक करण्यात आली. अटक केल्यापासून लकडावाला हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, एजाज लकडावाला यांने मंबई पोलिसांना सांगितले की, भारतीय गुप्तचर संस्थांची मदत घेऊन दाऊद इब्राहिम याचा काटा काढण्याचा प्रयत्न 1998 मध्येच छोटा राजन याने केला होता. त्यासाठी फरिद तनाशा, बाळू डोकरे, विनोद मटकर, संजय घाटे, बाबा रेड्डी आणि मी स्वत: (लकडावाला) अशी टीम तयार होती. दाऊदची मुलगी मारिया हिचा मृत्यू झाला होता. त्या वेळी दाऊद हा कराची येथील एका दरग्यात आला होता. (हेही वाचा,कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक )

आम्ही दबा धरुन बसलो होतो. मात्र, नेपाळचा खासदार मिर्झा बेग याने दाऊदला टीप दिली आणि गामचा गेम फसला. नानाचा खास शूटर विकी मल्होत्रा हा आमचा म्होरक्या होता, अशी माहिती एजाज लकडावाला याने मुंबई पोलिसांना सांगितले आहे. आम्हाला संधी मिळाली असती तर, तेव्हाच दाऊद इब्राहिम संपला असता असेही लकडावाला याने म्हटले आहे.