Kishori Pednekar (PC - Twitter)

COVID-19 Body Bag Scam: माजी नगराध्यक्षा किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना कोविड-19 बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी (COVID-19 Body Bag Scam) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुन्हा समन्स बजावले आहे. ED ने यापूर्वीदेखील पेडणेकर यांना समन्स बजावलं होतं. मात्र, त्या एजन्सीसमोर हजर झाल्या नव्हत्या. किशोरी पेडणेकर यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी चार आठवड्यांच्या मुदतवाढीची विनंती केल्यानंतर, एजन्सीने तेच समन्स 23 नोव्हेंबरला पुन्हा जारी केले.

कोवीड महामारी काळात झालेल्या मृत्यूंच्या बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावलं आहे. ईडीने केलेल्या दाव्यानुसार कंपनी बॉडी बॅग दुसऱ्या कंपनीला दोन हजार रुपयांना देत होती. तिच कंपनी मुंबई महापालिकेला तीच बॉडी बॅग तब्बल 6,800 रुपयांना देत होती. या कंपनीसोबत देण्यात आलेलं टेंडर तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सहीने देण्यात आलं होतं. (हेही वाचा -Mumbai Shocker: मुलूंड मध्ये Diagnostic Centre Technician ला 15 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी अटक)

पेडणेकर यांनी महापौर असताना केंद्रीय खरेदी विभागाचे प्रभारी हरिदास राठोड यांना त्यांच्या बंगल्यावर बोलावून वेदांत इनोटेकला कंत्राट देण्यास सांगितले. राठोड यांनी EOW ला दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी केअर सोल्युशनच्या बाजूने खरेदी ऑर्डरचा प्रस्ताव दिला.

तथापि, कंपनीने 2,000 बॉडी बॅगची पहिली बॅच दिली तेव्हा बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता ती नाकारली. त्यानंतर या पिशव्या अनफिट घोषित करण्यात आल्या. EOW तपासणीनुसार, जून 2020 पर्यंत, विविध कारणांमुळे पर्यायी पुरवठादार निश्चित झाला नव्हता. BMC ने वेदांत इनोटेक कडून 6,719 रुपये प्रति युनिट दराने बॉडी बॅग खरेदी करण्यास सुरुवात केली.