महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या ईडीच्या (ED) रडारवर आहे. आज (25 जून) सकाळी ईडीच्या पथकाने त्यांच्या नागपूर (Nagpur) मधील घरावर छापे टाकले आहेत. ही महिन्याभरातील ईडी कडून दुसरी कारवाई असल्याने आता अनिल देशमुखांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले आहेत. त्यामुळे सध्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था दएखील पहायला मिळत आहे.दरम्यान अनिल देशमुख आज नागपूर मध्ये नाहीत असे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत. नक्की वाचा: Anil Deshmukh: आपल्याला न केलेल्या गुन्हांची शिक्षा देण्याचं काम सुरु - अनिल देशमुख.
काही दिवसांपूर्वी ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरतही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे वाढली होती. सध्या अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं असून स्थानिक पोलिसांनी देखील सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. दरम्यान ईडी स्थानिक पोलिसांना न कळवता आल्याने आयत्या वेळेस त्यांनी बंदोबस्त वाढवला असल्याचेही सांगितले आहे.
ANI Tweet
Maharashtra: Enforcement Directorate (ED) raids 's residence in Nagpur, in connection with an alleged money laundering case.
Visuals from outside his residence. pic.twitter.com/PD69rBSOsv
— ANI (@ANI) June 25, 2021
मे महिन्यात ईडी कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर ईडी च्या सोबतीने सीबीआय ने देखील त्यांच्याविरूद्ध गुन्हादाखल केला असून तपास सुरू आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी महिन्याकाठी 100 कोटी गोळा करण्यासाठी बार आणि रेस्टॉरंट वर छापे टाकण्याचे आदेश दिल्याचे खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर न्यायालयीन प्रकरण, चौकशींचा ससेमिरा देशमुखांच्या मागे लागले आहे आणि यामध्येच त्यांनी महाविकास आघाडी मध्ये गृहमंत्री पदावरून पायउतार होत आपला राजीनामा दिला होता.