Enforcement Directorate | (File Photo)

अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) कर्नाला नागरी सहकारी बॅंक लिमटेडचे (पनवेल) (Karnala Nagari Sahakari Bank Ltd) माजी अध्यक्ष विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) याच्यांविरोधात न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे. त्यांच्यावर 67 बनावट खात्यांच्या माध्यमातून तब्बल 560 कोटी रुपयांची फसवणूक (Bank Fraud Case) केल्याचा आरोप आहे. ईडीने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे वर्ष 2019 मध्ये तपास सुरू केला. तसेच याप्रकरणात त्यांना 15 जून रोजी अटक केली होती.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, कर्नाला नागरी सहकारी बॅंक लिमिटेडचे (पनवेल) 2019 मध्ये ऑडिट करण्यात आले. या ऑडिटदरम्यान, असे आढळू आले की, विवेकानंद पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते. तसेच कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा क्रीडा अकादमीमध्ये पैसे टाकत होते. या दोन्ही संस्था पाटील यांनीच निर्माण केल्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. ही फसवणूक 2008 पासून सुरु असल्याचे तपासातून उघड झाले. हे देखील वाचा- संजय राठोड यांच्यावर अजून एक आरोप; शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

पीएमएलए अंतर्गत करण्यात आलेल्या तपासादरम्यान असे आढळून आले की, ही फसवणूक 57 बनावट खात्यांद्वारे करण्यात आली होती. ही फसवणूक व्याजासह सुमारे 560 कोटी रुपयांची होती. फसवणूक लपवण्यासाठी विवेकानंद पाटील यांनी वेगवेगळ्या खात्यांद्वारे पैसे त्यांनी स्थापन केलेल्या नियंत्रित संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले.

ही रक्कम कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा क्रीडा अकादमी इत्यादींनी क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यासारख्या मालमत्तांच्या बांधकामासाठी आणि इतर वैयक्तिक फायद्यांसाठी वापरली होती, ज्यामुळे गुन्ह्यातील उत्पन्नाचा वापर झाला आणि अशा प्रकारे मनी लॉन्ड्रिंग झाली.