ECI ON EVM Machine Theft Case: ईव्हीएम मशिन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, मोठी कारवाई; घ्या जाणून
EVM Machine | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मतदान प्रक्रियेत ईव्हीएम वापरावरुन आगोदरच अनेक शंका उस्थित झाल्या असताना त्यात भर म्हणून चक्क ईव्हीएम मशिन चोरीला (Electronic Voting Machine Stolen) गेल्याची धक्कादायक घटना पुणे (Pune News) जिल्ह्यात घडली. ईवीएम हटाओ देश बचाओ (Evm Hatao Desh Bachao) अभियान संबंध देशभर जोर धरत असतानाच ही घटना घडल्याने केंद्रीय निवडणूक आयोग खडबडून जागा झाला आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम चोरीची गंभीर दखल घेत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबीत केले आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते. ज्यामुळे लोकशाही प्रणालीत मतदान प्रक्रिया निष्पक्ष पार पडत नाही, असा अनेकांना आक्षेप आहे. त्यातच ही घटना घडल्याने आयोगाने सक्रीयता दाखवत कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

कोठे घडली घटना?

पुणे (Pune News) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) सासवड तहसील (Saswad Tehsil Office) कार्यालय /येथून ईव्हीएम मशिन चोरीला गेले. कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात इव्हीएम मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यातीलच काही मशीन चोरीला (EVM Machine Theft) गेल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील कर्मचारी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाले तेव्हा. स्ट्रॉंगरुमचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. ज्यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्येही खळबळ उडाली. (हेही वाचा, EVM Machine Theft: ईव्हीएम मशीन चोरीला, कंट्रोल युनिटही बेपत्ता; पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातील घटना)

आयोकाकडून काय कारवाई?

प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश निघाले आहेत. ज्यामध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे (Pune Crime news) आदेश दिल्याचे समजते. या शिवाय ही कारवाई केल्यानंतर मुख्य सचिवांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (हेही वाचा, लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत; 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स'ने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव)

आरोपींना अटक

दरम्यान, ईव्हीएम मशिन चोरीला गेले प्रकरणी मोठी खळबळ उडाल्याने पोलिसांवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. पोलिसांनी प्रकरणात तातडीने तापस करत दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अवघ्या 24 तासांमध्ये दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना जेजुरी येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी हे कृत्य कोणत्या कारणास्तव केले. हे कृत्य करण्यामागे आणखी कोणाचा हात आहे का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.  (हेही वाचा, Sanjay Raut Challenge BJP: बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, प्रभू रामच काय 33 कोटी देवही तुम्हाला वाचवणार नाहीत; संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान)

दरम्यान, ईव्हीएम विरोधात देशभरात जनमत तयार होऊ लागले आहे. केंद्र सरकार निवडणूक आयोगाला अथवा मतदना प्रक्रियेतील काही लोकांना हाताला धरुन ईव्हीएममध्ये फेरफार करत असल्याचा देशभरातील अनेक नामवंतांनी आरोप केला आहे. याममध्ये विचारवंत, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, अभियंते, सामाजिक चळवळीतील लोक, राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि विविध संस्थांचा समावेश आहे. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांद्वारे म्हणजेच बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, ही मागणी वाढत आहे.