Palghar Earthquake Tremors: पालघर, तलासरी, डहाणू मध्ये भूकंप; 3.2 रिश्टल स्केलच्या धक्क्यांनी हादरला परिसर
Representational Image |(Photo Credits PTI)

Palghar Earthquake on 13 August: महाराष्ट्रामध्ये आज (13 ऑगस्ट) पालघर मध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 5 वाजून 38 मिनिटांनी झालेला भूकंप सुमारे 3.2 रिश्टल स्केलचा होता. पालघर(Palghar) सोबतच हे भूकंपाचे धक्के डहाणू (Dahanu), तलासरी (Talasari) या भागातही जाणवले आहेत. भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने त्यामुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.

महाराष्ट्रातील पालघर हा भाग भूकंपग्रस्त भागांपैकी एक आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात वारंवार भूकंपाचे धक्के बसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यापूर्वी दिवसभरात लागोपाठ 5-6 धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. या भागातील अनेकांनी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.  यामध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना एका चिमुकलीचा जीव गेला होता.

ANI Tweet

पालघर शहराला आठवड्याभरापूर्वी मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने पूरसदृश्य स्थिती होती. आता पालघर शहर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे.