E-Crop Survey Mobile App (PC- Twitter)

E-Crop Survey Mobile App: ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ (Ease of Doing Business) साठी महत्वाचे साधन ठरणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सांगितलं आहे.

आज मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई-पीक पाहणीसंदर्भाच बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी विभागाने ‘विकेल ते पिकेल’ ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार या मोबाईल ॲपमुळे शेतकरी वर्ग संघटित होणे आवश्यक आहे. (हेही वाचा -Coronavirus: राज्यत गेल्या 24 तासात 32,007 जणांना डिस्चार्ज, 344 रुग्णांचा मृत्यू)

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचं वैशिष्ट्य -

  • ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना कोणतं पीक घ्यावं, यासंदर्भात माहिती मिळण शक्य होणार आहे.
  • कोणते पिक कोणत्या भागात घेतले जावे याविषयी आवश्यक माहिती पुरवण्यात येणार
  • कोणत्या पीकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे, याची माहिती शेतकऱ्यांना या अॅपद्वारे मिळणार आहे.
  • याशिवाय पिकाला योग्य भाव कसा मिळेल, याचीदेखील माहिती शेतकऱ्यांना या अॅपद्वारे मिळणं शक्य होणार आहे.

दरम्यान या अॅपची निर्मिती टाटा ट्रस्ट मार्फत करण्यात येत आहे. ई- पीक पाहणी संदर्भातील मोबाईल ॲप हे अत्यंत उत्कृष्ट ॲप असणार आहे. सध्या नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकांची माहिती देणे अधिक सोपे होणार असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.