Coronavirus: राज्यात गेल्या 24 तासात 32,007 जणांना डिस्चार्ज, 344 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

राज्यात गेल्या 24 तासात 15,738 जणांचे कोरोना व्हायरस (Coronavirus) अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 344 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब अशी की याच काळात 32,007 जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra State Health Department) राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरस संसर्गाने मृत्यू झालेल्या, प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या रुग्णांची आणि डिस्चार्ज मिळालेल्यांचीही एकूण आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 12,24,380 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे वाटत असलेल्या आणि प्रकृती सुधारल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आलेल्या 9,16,348 जणांसह प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,74,623 रुग्णांचाही समावेश आहे. तसेच एकूण संक्रमितांपैकी आतापर्यंत 33,015 नागरिकांचा कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झाल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, राज्यातील कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकवरी रेट) 74.84% इतका आहे. तर, मृत्यू दर अवघा 2.7% इतका आहे. कोरोना व्हायरस चाचणीसाठी आतापर्यंत 59,12,258 इतके नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 12,24,380 जणाची कोरना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली.कोरोना व्हायरस संसर्गाचा राज्यातील सरासरी दर हा 20.71% इतका राहिला आहे. राज्यात आतापर्यंत 18,58,924 इतके नागरिक होम क्वारंटीन आहेत. तर, 35,517 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. (हेही वाचा, Coronavirus Update In Mumbai: मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आज 1,837 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 36 जणांचा मृत्यू)

देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. देशात आतापर्यंत 54,87,580 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. त्यापैकी 43,96,400 जणांना उपराचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. 87,882 जणांचा मृत्यू झाला. तर 1003299 जानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.