प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून पिकांची नुकसान भरपाई कशी करावी हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. मात्र शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून सरकारकडून 10 हजार कोटींची मदत करण्याचे निर्देशन प्रशासनाला देण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंदर फडणवीस यांनी दिली आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवास स्थानी पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना मदत म्हणून कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रशानसानकडून पंचनामा न झाल्यास शेतकऱ्यांनी पिक नुकसानीचा फोटो काढून पाठवला तरीही त्यांना मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर केले जाणार असून शेकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार नेहमीच पाठीशी उभे असणार आहे. तत्काळ मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार कोटी रुपये येणार आहेत. तर शेतकऱ्यांना जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर मदत करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मदत मिळण्यास वेळ लागल्यास शेतकऱ्यांना राज्य सरकार निधीमधून सहाय्यक करणार आहे. (Maharashtra Monsoon Forecast: 'महा' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या 24 तासात मुंबईसह महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता)

यंदाच्या वर्षात प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडल्याने अनेक नागरिकांचे नुकसान झाले. तसेच राज्यातील विविध भागात पुरस्थिती सुद्धा निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. तर अरबी समुद्रात आलेल्या चार प्रखर वादळांचा फटका राज्याला बसल्याने अधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे पेरणीच्या सुरुवातीलाच खंड पडल्याने मुग, उडीद यांसारखी पिके उद्धस्त झाली. त्यानंतर मात्र पुन्हा पावसाने राज्यात जोर धरला होता. मात्र अवकाळी पावसाने या संपूर्ण शेतपिकांचे नुकसान झाले आहे.