गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने 1 नोव्हेंबर पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा हजेरी लावली. त्यात महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टीवर निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात 'महा' चक्रीवादळाचे संकट येणार नसले तरीही त्याचा प्रभाव म्हणून पुढील 24 तास मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने (Skymet) वर्तवली आहे. मुंबईत ब-याच भागात मागील 1-2 दिवसांपासून पावसाची कोसळधार सुरु आहे. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला चांगलेच झोडपले असून याचा फटका महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला जास्त बसला. यामुळे शेतक-यांच्या पिकांचे नुकसानही झाले.
पूर्व मध्य अरब सागरावर तीव्र चक्रीवादळ असून ही हवामान प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने पुढे जात आहे. ही वादळ जरी महाराष्ट्रापासून दूर जात असले तरीही याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.
चक्रीवादळ महा च्या प्रभावामुळे सांगली, वेंगुर्ला आणि मुंबईत पावसाची शक्यता#MumbaiRains #Weathercloud #maharashtra #CycloneMahahttps://t.co/kKO9i3UMU7
— Skymet Marathi (@SkymetMarathi) November 1, 2019
रत्नागिरी, सांगली, सातारा या जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता सध्या तरी महाराष्ट्रात नसली तरीही किनारपट्टीवर 'महा' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जोरदार वारे वाहतील.
हेदेखील वाचा- ‘महा’ चक्रीवादळाचा मासेमारीला फटका; खराब हवामानामुळे 90 दिवसांपासून मासेमारी व्यवसाय बंद
तसेच समुद्रही खवळलेला असल्या कारणाने मच्छिमारांनाही समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या 90 दिवसांपासून राज्यातील मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टयामुळे तयार झालेल्या क्यार चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. राज्यातील क्यार चक्रीवादळाचा धोका टळला नाही तर लगेचच ‘महा’ चक्रीवादळाचे सावट मच्छीमारांच्या डोक्यावर घोगांवत आहे ‘महा’ वादळामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी माघारी परतल्या आहेत.