रहदारी (Archived images)

नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यात लोकांना कोणतीही ट्रॅफिकची समस्या उद्भवू नये यासाठी मुंबईतील मोक्याची ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. हे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) तील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आले आहेत.लोकांना नववर्षाची पूर्वसंध्या अगदी आनंदात घालविता यावी यासाठी हे विशेष बदल करण्यात आले आहेत. कुलाबा वाहतूक विभागाकडून 31 डिसेंबर 2019 संध्याकाळी 8.00 वाजल्यापासून 1 जानेवारी 2020 ला सकाळी 6.00 वाजेपर्यंत हे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहे.

एन.एस.रोड, एन.सी.पी.ए रोड ते विनोली चौपाटी येथे सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज मार्ग दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांन करिता बंद ठेवण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्रे येथील महत्त्वाच्या मार्गांवर करण्यात आली विशेष वाहतूक व्यवस्था; पार्किंगसाठी खास उपाययोजना

कसा कराल प्रवास?

एन.एन.रोड ते फ्री वे

N.S. रोडवरुन येणारी वाहने चर्चगेट, सीटीओ, हुतात्मा चौक, रिगल जंक्शन मार्ग पुढे जातील.

एन.एस रोड ते जे.जे. फ्लायओव्हर ब्रिज

एन.एस.रोडवरुन येणारी वाहने चर्चगेट, सीटीओ, सीएसएमटी मार्ग जे.जे.फ्लायओव्हर ब्रिजवर जातील.

मुंबईतील अनेक भागांत वाहनांना पार्किंग बंदी देखील नाकारण्यात आली आहे. हा बदल 31 डिसेंबर 2019 संध्याकाळी 8.00 वाजल्यापासून 1 जानेवारी 2020 ला सकाळी 6.00 वाजेपर्यंत राहील.