Thane Rains: ठाण्यात मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, शाळा बंद; ठाणे पोलिसांकडून हेल्पलाईन नंबर जारी
Representational Image (Photo Credits: IANS)

रात्रीपासून ठाणे शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर रेल्वे ट्रॅकही जलमय झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वृंदावन सोसायटी परिसर जलयम झाला असून संभाजीनगर मधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांचा चांगलेच हाल झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

ठाणे पोलिस ट्विट:

ठाणे रेल्वे स्थानक:

ठाण्यातील पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून वाहतूक मंद गतीने सुरु आहे. ठाण्यासह डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसंच पुढील काही तास मुंबई सह उपनगरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

ठाण्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ठाणे पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.

ठाणे पोलिस ट्विट:

तसंच ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्कालीन बंदोबस्ताकरिता नेमले असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी ट्विट करुन दिली आहे. तसंच नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून अडचणीच्या वेळी 100 क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.