Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago
Live

Maharashtra Monsoon 2019 Live Updates: मध्य रेल्वेची खोळंबलेली वाहतूक सुरु

महाराष्ट्र Darshana Pawar | Aug 03, 2019 05:12 PM IST
A+
A-
03 Aug, 17:12 (IST)

मध्य रेल्वेची खोळंबलेली वाहतूक सुरु झाली असून कुर्ल्याहून कल्याणच्या दिशेने पहिली लोकल 4.43 मिनिटांनी रवाना झाली.

03 Aug, 16:55 (IST)

टिळक नगर व चेंबूर येथील कोणत्याही पूल अथवा रोड ओव्हर ब्रिजचा (स्लॅब) खाली कोसळलेला नाही. हा आरओबीच्या दुभाजकाचा भाग पडलेला आहे. पडलेल्या भागाचे तुकडे आता साफ करण्यात आले असून त्यामुळे झालेला विस्कळीत झालेली वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

03 Aug, 16:39 (IST)

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

03 Aug, 15:36 (IST)

सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे कुर्ला, सायन, चुनाभट्टी या भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वाशी दरम्यानची लोकलसेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. तसंच मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे वाहतूकही ठप्प झाली आहे.

03 Aug, 15:28 (IST)

ठाणे येथील घोडबंदर रोडवरील वसंत लीला संकुलातील संरक्षक भिंत कोसळली असून त्यात एका कारचे नुकसान झाले आहे.

03 Aug, 14:04 (IST)

खारघर येथील पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्या असून एकीचा मृतदेह हाती लागला आहे. तिघींचा शोध अद्याप सुरु आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे.  या नेरुळ येथील एसआयईएस कॉलेजच्या विद्यार्थीनी आहेत.

03 Aug, 13:59 (IST)

पावसामुळे ठाणे येथील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले असून त्याचे काही फोटोज समोर आले आहेत. (Photos)

03 Aug, 13:44 (IST)

पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने अंधेरी सबवे मधील पाणी काहीसे ओसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन BMC ने  केले आहे. तसंच BMC कडून सातत्याने मुंबईच्या पावसाचे अपडेट्स दिले जातील.

03 Aug, 12:59 (IST)

मुंबईसह उपनगरांमध्ये सातत्याने सुरु असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे नागरिकांची दैना झाली आहे. रेल्वे ट्रॅक, सखल भागांसह आता बसमध्येही पाणी साचले आहे. पहा कल्याणमधील हा व्हिडिओ.

03 Aug, 12:46 (IST)

येत्या 24 तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसंच काल रात्री पासून होणाऱ्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे मुंबईतील शाळांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Load More

रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. त्याचबरोबर अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग या भागातही चांगलाच पाऊस होत आहे. विरार वसईमध्ये देखील पावसाचा जोर वाढला असून सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होत असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीच्या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, नाशिक, कोल्हापूर या भागातही वरुणराजा चांगलाच बरसत आहे.

IMD ट्विट:

येत्या 24 तासांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. जुलैही महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे महाराष्ट्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले होते.


Show Full Article Share Now