Mumbai Police: कंटेट पायरसी प्रकरणामुळे मुंबई पोलिसांनी टेलिग्राम ग्रुप बीजे टेक नॉलेज (BJ Tech Knowledge) बंद केला आहे. डिस्ने स्टार, वायकॉम 18, सोनी आणि झी सारख्या मोठ्या प्रसारकांकडील शोज आणि चित्रपट बेकायदेशीरपणे साम्रगी वितरण कराणाहा हा ग्रुप होता. या प्रकरणी डिस्ने स्टारने मुंबई पोलिसांनी तक्रार नोंदवला होता. पोलिसांनी चौकशीतून एकास अटक केले आहे. (हेही वाचा- विप्रोमध्ये मोठी नोकर भरती; 10 हजार ते 12 हजार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार)
मिळालेल्या माहितीनुसार, टेलिग्राम बीजे टेक ग्रुपमध्ये 5000 हून अधिक वापरकर्ते होते. प्रत्येकाला ३०० रुपयात लिंक विकल्याचे समोर आले आहे. डिस्ने स्टार, वायकॉम 18, सोनी आणि झी सारख्या मोठ्या प्रसारकांच्या सामग्रीमध्ये बिनापरवाना प्रवेश केला होता. डिस्ने स्टारला या प्रकरणी माहिती मिळताच, पोलिसांकडे धाव घेतली. अश्या पध्दतीने मालिका आणि चित्रपट विकल्या गेल्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसल्याचे डिस्नेने माहिती दिली.
या प्रकरणी डिस्ने स्टारने 27 एप्रिल 2024 रोजी एनएम जोशी मार्ग पोलिस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी अॅक्शन मोड घेतला. मुंंबई पोलिसांनी बालाजी आसाराम जायभाये याला अटक केले. बालाजीने बेकादेशीरपणे मोठमोठ्या प्रसारकांच्या सामग्रीचे कंटेट चोरी लागला आणि टेलिग्रामवरील बीजे टेक नॉलेज या ग्रुपमधून विकायचा. आरोपीवर एफआयआर दाखल केल्यानंतर ग्रुप देखील बंद केला. याची प्रत ET समोर मांडण्यात आली आहे.