खराब हवामानामुळे मुंबई, दिल्ली यांच्यासह 8 शहरातून शिर्डीला जाणारी विमानसेवा 5 दिवसांपासून ठप्प
Representational Image (Photo Credits: Youtube Grab/Nijam Ashraf)

खराब हवामानामुळे मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi), इंदोर (Indore), भोपाळ (Bhopal), बंगळरु (Bengalaru), चेन्नई (Chennai), हैदरबाद (Hyderbad), जयपूर (Jaipur) या शहरातून शिर्डीला (Shirdi) जाणारी विमानसेवा पाच दिवसांपासून ठप्प झाली आहे. दरम्यान, साई मंदिराच्या दर्शनास येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना याचा फटका बसला आहे. साईबाबा आंतराष्ट्रीय विमानतळावर (Shirdi InternaTional Airport) दिवसभरात 28 विमानांचे टेकऑफ आणि लॅंडींग होत असते. मात्र, धुक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिर्डी विमान सेवा ठप्प आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने विमाने माघारी नेण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षात प्रथमच अशा प्रकारची मोठी अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिर्डीकडे येण्यासाठी दररोज 2 हजारहून अधिक प्रवाशी विमानाने प्रवास करत असतात. मात्र, गुरुवारपासून शिर्डी परिसरात धुक्याचे प्रमाण अधिकच वाढल्यामुळे विमान सेवा ठप्प झाली आहे. तसेच शिर्डी विमानतळावरील सर्व विमानांचे लॅंडींग आणि टेकऑफ रद्द करण्यात आल्याची माहिती शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमान प्रधिकरणाचे संचालक दीपक शात्री यांनी दिली आहे. मात्र विमानसेवा बंद असल्याने भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. महत्वाचे म्हणजे, विमान कंपन्यांकडून प्रवाशांना आगाऊ सूचना देत नसल्याने भाविकांच्या मनस्तापात  आणखी भर पडत आहे. दरम्यान, मुंबई, दिल्ली, इंदोर, भोपाळ, बंगळरु, चेन्नई, हैदरबाद, जयपूर या शहतातून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे देखील वाचा-विमान प्रवासात चार महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यावर्षी धुक्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. यामुळे शिर्डी येथील साईमंदिराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल होत आहेत. विमान प्रवास सोयीस्कर असल्यामुळे अनेकजण विमानातून प्रवास करत असतात.