दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेता कुमरी (South Actress Shweta Kumari ) हिला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau) ने अटक केली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कन्नड अभिनेत्री श्वाता कुमारी (Shweta Kumari ) हिला आज एनसीबी (NCB ) द्वारा अटक करण्यात आली. 2 जानेवारीला तिच्याकडून 400 ग्राम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले होते. याच प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे.
एनसीबी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान सईद शख नावाच्या एका ड्रग्ज सप्लायरबाबात माहिती मिळाली. हा सप्लायर अवघा 25 वर्षांचा आहे. सईद हा मीरारोड येथील क्राउन बिझनेस हॉटेलमध्ये लपला आहे. तेथूनच तो आपला धंदा चालवत असतो. या माहितीवरुन एनसीबीच्या एका पथकाने त्या हॉटेलवर छापा टाकला.
एनसीबीतील सूत्रांच्या आधारे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एनसीबीने या हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात श्वेता कुमारी नामक अभिनेत्री आढळली. या अभिनेत्रीकडे काही प्रमाणात एमडी ड्रग्ज मिळाले. यानंतर एनसीबीने तिला ताब्यात घेतले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर एनसीबीने मुंबईत ड्रग्ज प्रकरणाबाबत जोरदार शोधमोहीम राबवली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटक केली होती. सध्या हे दोघेही जामीनावर बाहेर आहेत.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि अर्जून रामपाल यांच्यासारखे दिग्गज अभिनेते आणि मॉडेल्सचीही एनसीबी चौकशी करत आहे. यातील बहुतांशजण एनसीबी कार्यालयात येऊन गेले आहेत.