Drowning | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुण्यामध्ये पावना धरणात (Pawna Lake) दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे दोन्ही तरूण मावळ तालुक्यातील दूधीवरे भागातील होते. ही घटना बुधवार 4 डिसेंबरच्या दुपारी 12 ची आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेले तरूण मयुर रविंद्र भारासके (25) आणि तुषार रविंद्र अहिरे (26) आहेत. हे दोघेही पुण्याचे असले तरीही मूळचे भुसावळ मधील आहेत.

दोघेही तरूण बालेवाडी मध्ये खाजगी कंपनीत कामाला होते. मयूरचा मृतदेह आधी सापडला त्यानंतरकाल तुषार चा देखील मृतदेह हातात आला. यामध्ये एकजण बोट उलटल्याने पाण्यात पडला आणि दुसरा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला पण यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.

दरम्यान, लोणावळ्यातील पवना धरणाच्या भागात या दु:खद घटनेने हळाहळ व्यक्त केली जात आहे.आता या भागात वाढीव सुरक्षा उपायांसाठी तातडीने आवाहन करण्यात आले आहे. पोलिस आणि पाटबंधारे विभागासह स्थानिक अधिकाऱ्यांनी पर्यटकांनी धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने आणि धोकादायक पाण्यात जाण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी बंगला मालक आणि बोट मालकवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला आहे. पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात लेक इस्केप व्हिला या बंगल्यात हे तरूण थांबले होते. तेथूनच थेट धरणामध्ये उतरण्यासाठी रस्ता आहे.एकजण बोट घेऊन पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.