Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

अहमदनगर येथे एका आईने मुलगा शिक्षक असून नोकरी नाही आणि बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संगीता फसले असे महिलेचे नाव आहे.

फसले यांच्या मुलाचे शिक्षण डीएड पर्यंत पूर्ण झाले होते. तरीही त्याला शिक्षण पूर्ण करुन ही नोकरी मिळाली नाही. तर संगीता या मजूर असून दुष्काळात त्यांना ही पुरेसा रोजगार मिळत नव्हता. या अशा प्रकारच्या दुहेरी नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आपले जीवन संपवले आहे.

(ठाणे: ढोकाळी येथील सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू; 5 जण जखमी)

महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तसेच आर्थिक स्थिती दुष्काळामुळे खालावली जात असल्याच्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे.