ठाणे: ढोकाळी येथील सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू; 5 जण जखमी
Sewage Treatment Plant at Pride Presidency Luxuria in Dhokali Thane (Photo Credits: ANI/Twitter)

ठाणे (Thane) येथील ढोकाळी (Dhokali) परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (Sewage Treatment Plant) सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री 12:30 च्या सुमाराही ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. (मुंबई: वसई-विरार महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; प्रशिक्षकासह चार जण अटकेत)

ANI ट्विट:

 

सेप्टीक टँकमध्ये अडकलेल्या 8 जणांपैकी 3 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जणांचे प्राण वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले.