Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युनंतर सुप्रिया सुळे, नितीन राऊत, अतुल भातखळकर, रक्षा खडसे, रोहित पवार यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
Sheetal Amte (Photo Credit: Twitter)

महारोगी सेवा समितीच्या सीईओ, ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात डॉक्टर शीतल आमटे (Sheetal Amte) यांनी आज आत्महत्या (Suicide) केली आहे. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. होते. मात्र, रुग्णालयात पोहचताच तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. शीतल यांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. डॉ. शितल यांच्या मृत्युनंतर राजकीय विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut), भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse), राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीदेखील श्रद्धांजली वाहली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल आमटे या सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. मात्र, शीतल या गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते. यातच आज त्यांनी आत्महत्याची केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शीतल आमटे यांनी आत्महत्या का केली? अद्याप या बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, त्यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. हे देखील वाचा- Dr. Sheetal Amte Suicide: आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या, कारण अस्पष्ट

सुप्रिया सुळे यांचे ट्विट-

डॉ. नितीन राऊत यांचे ट्विट-

अतुल भातखळकर यांचे ट्विट-

 

रक्षा खडसे यांचे ट्विट-

रोहित पवार यांचे ट्विट-

शीतल आमटे या डॉक्टर, अपंगत्व विशेषज्ज्ञ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या. बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची त्या कन्या आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.