Dr. Sheetal Amte Suicide: आनंदवन मधील महारोगी सेवा समितीच्या प्रमुख डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र शीतल आमटे यांनी आत्महत्या का केली या मागील कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु शीतल आमटे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले गेले. वैद्यकिय अधिकारी सुत्राने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विषारी इंजेक्शन लावून आपले आयुष्य संपवल्याचे बोलले जात आहे. त्याचसोबत त्या गेल्या काही काळापासून तणावात असल्याचे ही म्हटले जात आहे.
शीतल आमटे यांनी आज 8 तासांपूर्वी ट्विट करत एक कॅव्हास वरील पेंन्टिंग शेअर केले होते. Abstarack पद्धच्या या चित्राला त्यांनी 'War and Peace' असे कॅप्शन दिले होते.
'War and Peace'#acrylic on canvas.
30 inches x 30 inches. pic.twitter.com/yxfFhuv89z
— Dr. Sheetal Amte-Karajgi (@AmteSheetal) November 30, 2020
शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यामध्ये शीतल यांनी महारोगी सेवा समितीच्या कामासंदर्भात, विश्वस्त आणि कार्यकर्त्यांबद्दल काही आरोप केले होते. परंतु फेसबुक लाईव्ह नंतरच्या दोन तासात ते डिलिट करण्यात आले. मात्र आमटे यांच्या कुटुंबाने एक निवदेन जाहीर केले होते. त्यामध्ये शीतल आमटे यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले होते.