Dr Mahinder Watsa Dies at 96: मुंबई मधील प्रसिद्ध Sexpert महिंदर वात्सा यांचं निधन
Dr Mahinder Watsa (Photo Credits: Twitter)

मुंबई मधील प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट Dr Mahinder Watsa यांचे आज (28 डिसेंबर) सकाळी निधन झाले आहे. ते 96 वर्षांचे होते. Dr Mahinder Watsa हे सेक्सोलॉजिस्ट  असून ते वृत्तपत्रातील आणि मासिकातील त्यांच्या सेक्स कॉलमसाठी प्रसिद्ध होते. भारतामध्ये सेक्स एज्युकेशन बद्दल सजगता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे प्रसिद्धी आणि अवॉर्डस मिळाले आहेत. 'मुंबई मिरार' या टॅबलॉईडमध्ये ते Ask the Sexpert हा कॉलम लिहित होते. 2005 साली त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षापासून तो लिहायला सुरूवात केली होती. त्यांच्या मिश्किल उत्तरामधून ते वाचकांचं प्रबोधन आणि मनोरंजन देखील करत होते. सेक्शुअल हेल्थ बाबतच्या प्रश्नांवर ते वाचकांच्या प्रश्नाला उत्तरं देत असतं. Tips to Improve Your Sex Life: सेक्स लाईफ Interesting बनविण्यासाठी 'या' छोट्या छोट्या गोष्टींना द्या प्राधान्य!

मुंबई मिरर ने दिलेल्या वृत्तामध्ये वास्ता यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा देत आपली भावना व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी 'बाबा बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या अटी शर्थीवर ते उत्तम आयुष्य जगले. आज आम्ही त्यांच्या निधानानंतरही त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करत आहोत' असे म्हटलं आहे.

सुरूवातीला वास्ता हे महिलांच्या मासिकामध्ये 1960 साली कॉलम लिहायला लागले होते. पुढे त्यांनी अनेल महिला मासिकांमध्ये सदरं लिहली आहेत. 1974 साली त्यांनी Family Planning Association of India चे सल्लागार म्हणून काम केले. त्यावेळेस त्यांनी दिलेल्या सूचनांचा विचार करत देशातील पहिलं sex education, counselling and therapy सेंटर उभं केलं. पुढे 1980 साली त्यांनी प्रॅक्टिस सोडून पूर्णवेळ काऊन्सलिंग आणि शिक्षण देण्याच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं.