Dr.Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2018 : दादर स्टेशनचं नामांतर होऊ नये - प्रकाश आंबेडकर
prakash ambedkar and dadar Station (Photo Credits : commons.wikimedia)

Dr.Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2018 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त सध्या देशभरातून भीम अनुयायी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहेत. दरम्यान भीम आर्मीच्या (Bhim Army) कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून डॉ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल्स (Dr Babasaheb Ambedkar Terminus) करण्यात यावं याकरिता मंगळवारपासून दादर स्टेशन आणि फूटओव्हर ब्रिज परिसरात स्टिकर्स लावून आंदोलन सुरु केले आहे. मात्र प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी दादर स्टेशनचं नामांतर होऊ नये असे मत व्यक्त केल्याने आंबेडवाद्यांमधील मतांतर समोर आले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुनायींसाठी BEST बस, रेल्वेच्या विशेष सुविधा

प्रकाश आंबेडकर आज चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात आले होते. त्यावेळेस मीडियाशी बोलताना त्यांनी दादर स्टेशनचं नाव बदलू नये असे म्हटलं आहे. पूर्वीपासून चालत आलेली रेल्वे स्टेशनची नावं ही त्या भागाची ओळख आहे. त्यामागे इतिहास आहे. तो पुसला जाऊ नये असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

भीम आर्मी सोबतच काही राजकीय पक्षांनी दादर स्टेशनच्या नामांतराला पाठींबा दिला होता. मात्र सरकारकडून या बाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी दादर स्टेशनच्या नामांतरांचा विषय हा आगामी निवडणुकीसाठी पुढे केलेली मागणी असे म्हणत दादरचं नाव बदलू नये असे म्हटले आहे.