Dongri Building Collapse Incident: केसरबाई इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर
Dongri Building Collapse Incident (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये सॅन्डहर्स्ट रोड स्टेशन नजिक डोंगरी भागात केसरबाई इमारत या सुमारे100 वर्ष जुन्या इमारतीचा काही भाग मंगळवार (17 जुलै) च्या दुपारी कोसळला. प्राप्त माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये 14 जण मृत्यूमुखी पडले आहेत तर इतर जखमींवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50,000 रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच सार्‍या जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे. अशी माहितीदेखील देण्यात आली आहे. केसरबाई इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 14; श्वानपथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू

ANI Tweet

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केसरबाई इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ या ठिकाणी भेट दिली होती. तेव्हा मीडियाशी बोलताना या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी हमी देण्यात आली होती. इमारतीत जवळजवळ 15 कुटुंबे राहत असल्याची माहिती देण्यात आली होती. आजही एनडीआरएफ पथक श्वानपथकाच्या मदतीने बचाव आणि शोधकार्य करत आहे.