Dongri Building Collapse: केसरबाई इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 14; श्वानपथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू
Dongri (Photo Credits: Twitter/ ANI)

मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरीही विविध ठिकाणी इमारती कोसळण्याचं अपघात सत्र सुरूच आहे. मंगळवार (17 जुलै) दिवशी डोंगरी परिसरात कोसळलेल्या इमारतीमध्ये मृतांचा आकडा आता 14 झाला आहे. केसरबाई नावाची चार मजली इमारतीचा निम्मा भाग कोसळून पडला. या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले आहे. आज सलग दुसर्‍या दिवशीही एनडीआरएफ कडून बचावकार्य सुरू आहे. आज श्वानपथकाच्या मदतीने मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे.

ANI Tweet

डोंगरी येथील कोसळलेली 'केसरबाई' ही 100 वर्ष जुनी इमारत म्हाडाची असल्याचे सांगितले जात आहे. तर बीएमसीने ही इमारत 2017 साली धोकादायक असल्याचं सांगितलं होतं तर ती तात्काळ रिकामी करण्याचेही आदेश दिल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हाडाने देखील ही इमारत 2012 साली रिकामी करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती दिली आहे. या दुर्घटनेची माहिती समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट देत सदर प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं म्हटलं आहे.

ANI Tweet

मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट2017 रोजी नोटीस बजावून इमारत रिकामी करण्याची सूचना केली होती. भविष्यात दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलो होते. तर म्हाडाने 2018 मध्ये रहिवाशांवर नोटीस बजावून ही इमारत रिकामी केली होती. अशी माहितीदेखील आता समोर आली आहे.