Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात दिलेल्या 'या' अभिप्रायावरून जितेंद्र आव्हाड भडकले; ट्रम्प यांची निंदा करतो म्हणत दिली 'अशी' प्रतिक्रिया
Jitendra Awhad (PC- Twitter)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज, 24 फेब्रुवारी ला भारत दौऱ्यावर येताच सर्वात प्रथम गुजरात (Gujrat) मधील साबरमती आश्रमाला (Sabarmati Ashram) भेट दिली. या आश्रमात महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  यांची ओळख असलेल्या चरख्यावर त्यांनी सूतकताई चा सुद्धा अनुभव घेतला. साबरमती आश्रमातून पुढे मोटर स्टेडियम ला जाण्यासाठी रवाना होण्याआधी त्यांनी साबरमती मधील एका रिव्ह्यू पुस्तकात आपल्या व्हिजिट विषयीचा अभिप्राय सुद्धा नोंदवला, मात्र यामध्ये त्यांना महात्मा गांधी यांचा कुठेही उल्लेख केला नसल्याने अनेकांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला आहे, याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर येतेय, आव्हाड यांनी ट्रम्प  यांची मी निंदा करतो असे म्हणत त्यांच्या अभिप्रायावर प्रतिक्रया दिली.  Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा अमेरिकेसाठी आहे महत्त्वाचा, कारण घ्या जाणून

डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती येथेही रिव्ह्यू पुस्तिकेत ‘माझे जिवलग मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ही अविस्मरणीय भेट घडवल्याबद्दल आभार,’ असा अभिप्राय नोंदवला आहे. तर या अभिप्रायावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निंदा केली आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. परंतु, हा आश्रम ज्या एका नावामुळे ओळखला जातो त्या महात्मा गांधीजींचा साधा उल्लेखही केला नाही. ट्रम्प यांना भारताचा इतिहास माहीत नसेल तर ही अत्यंत दुदैवी बाब आहे. असेही आव्हाड यांनी म्हंटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

दरम्यान, साबरमती भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प हे सहपरिवार अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम मध्ये दाखल झाले होते, येथे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यांनतर ट्रम्प परिवार आग्रा येथे दाखल झाला आणि जागतिक 7  आश्चर्यांपैकी एकमेव भारतीय आश्चर्य अश्या प्रेमाचे प्रतीक ताजमहालला त्यांनी भेट दिली.