डोंबिवली-तळोजा, मीरा भाईंदर-वसई मेट्रो मार्ग होणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo credit : PTI)

Kalyan: कल्याणमध्ये आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभेमध्ये डोंबिवली-तळोजा आणि मीरा भाईंदर-वसई मेट्रो मार्ग होणार असल्याची घोषणा ही केली आहे.

ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रोमुळे भिवंडी मुंबईसोबत जोडली जाणार आहे. त्यामुळे कल्याणकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये सांगितले. तसेच येत्या ५ वर्षामध्ये एक कोटी प्रवाशांची सोय होणार असून मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

या प्रकल्पावर रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून तातडीने मुंजरी दिली जाणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर डोंबिवली-तळोजा, मीरा भाईंदर-वसई मेट्रो मार्ग होणार असल्याचे जाहीर केले आहे.