एकनाथ खडसे यांना देण्यासाठी शिवसेना पक्षाकडे आहे तरी काय?- चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) नाराज असल्याच्या माहिती समोर आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी पक्षांतर संदर्भात खळबळजनक वक्तव्य केले होते. यातच एकनाथ खडसे शिवसेने जाणार असल्याच्या वृताचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खंडन केले आहे. मी एकनाथ खडसे यांची भेट घेतली असून त्यांच्याशी महत्वाच्या विषयावर चर्चा केली आहे. महत्वाचे म्हणजे, ते शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्तात काही तथ्थ नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांची सपुत्री रोहणी खडसे यांचा पराभव झाला. रोहणी यांचा पराभव अतंर्गत राजकारणांमुळे झाला आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यानंतर खडसे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर चंद्रकात पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवसेना पक्षाकडे खडसेंना देण्यसाठी आहे तरी काय? कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाली. त्यामुळे भाजपला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले. सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्या, अशी टीका चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. हे देखील वाचा- कोल्हापूर, नाशिक जिल्हा परिषद निवडणूक 2019: भाजप पराभूत; सत्तांतर करत महाविकासआघाडी सत्तेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागल्यापासून अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळाले. या निवडणुकीत भाजप- शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली असून जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. परंतु, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते.