Photo Credit: Twitter

महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसून राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला कोरोना निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोनाची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. या काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन कमर्चारी अहोरात्र मेहनत घेतली. मात्र, यापुढे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये’ असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत

तसेच, सर्वसामन्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी वर्तणूक करू नका. राज्यातील आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंधाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोरोना महामारीत कोविड योद्धा होता आले नाही, पण कोविडदूत बनून कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Aurangabad: औरंगाबादेत गुंडांची दहशत, उद्योजकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5 हजार 132 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, 8 हजार 196 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, आज 158 रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 62 लाख 09 हजार 364 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.93 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 64 लाख 06 हजार 345 झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत 1 लाख 35 हजार 413 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 % इतका आहे.