Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गेले काही दिवसांपूर्वीचं राज्य सरकारकडून (State Government) दिवाळी निमित्त शिधा वाटपाची घोषणा करण्यात आली होती. सर्वसामान्य जनता सरकारकडून मिळणाऱ्या या शिधाची आतुरतेने वाट बघत होती पण दिवाळी येवून ठेपली तरी शेतकऱ्यांच्या हातात मात्र अजूनही दिवाळीचा शिधा काही पडला नाही आणि आता पडला तर त्यात फक्त रवा (Rawa), साखर (Sugar), डाळ (Daal) या तीनचं वस्तूचा समावेश आहे. पण या शिधातून मात्र तेल गायब आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.  स्वयंपाक घरातील सर्वात आवश्यक वस्तू म्हणजे तेल आणि तीच या शिधातून गायब असल्याने राज्य सरकारवर मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रेशन दुकानदारांना डाळ रवा आणि साखरच द्यावी लागते, यासाठी 75 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांना अंदाजे 125  रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून तले विकत घ्यावे लागणार आहे. यामुळे नागरिकांना आनंदाची शिधा 200 रुपयांना पडत आहे.

 

ऐवढचं नाही तर आज दिवाळी आहे तरी बरेच नागरिकांपर्यत ही शिधा पॅकेट पोहोचलीचं नाही कारण यावर नेते मंडळींचे फोटो लावण्याचे काम सुरु असल्याने हा शिधा नागरिकांना वाटप करण्यास विलंब झाला. त्यात हा अर्धवट शिधाचं नागरिक करणार तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांकडून राज्य सरकारला विचारण्यात येत आहे. (हे ही वाचा:- Amravati Railway: अमरावतीत रेल्वे रुळावरुन मालगाडी घसरली, बडनेरा-वर्धा अप-डाऊन मार्गावर रेल्वे वाहतुक विस्कळीत; पहा व्हिडीओ)

 

नागरिकांना वाटपासाठी आलेल्या 'दिवाळी शिधा'च्या कीटमध्ये तीनच पदार्थ म्हणजे चना डाळ, साखर आणि रवा आले असून तेल मात्र या शिधा पॅकेटमधून (Shidha Packet) गायब आहे. त्यामुळे रेशन दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक तेलबाबत दुकानदारास विचारत आहे. पॅकेटमध्ये वरूनच तेल आले नसल्याचे प्रत्येक ग्राहकांना समजून सांगताना दुकानदारांना वेगळा मनस्ताप होत आहे. तर अनेक ठिकाणी तुम्हीच तेल वाटप करत नसल्याचा आरोप रेशन दुकानदारांवर होत असल्याने, त्यांना दमछाक होत आहे.