Disha Salian चा मृत्यू घातपात नव्हे अपघात; CBI  च्या रिपोर्टमधून समोर आलं मृत्यूचं कारण
Disha Salian (Photo Credits-Twitter)

मुंबई मध्ये 2 वर्षांपूर्वी टॅलेंट मॅनेजर दिशा सॅलियन(Disha Salian) चा मृत्यू झाल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या पण सीबीआय कडून आता हा मृत्यू केवल अपघात आहे. त्यामध्ये घातपात नसल्याचं सांगण्यात आल्याचं वृत्त मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

सीबीआयच्या अहवालामध्ये दिशा दारूच्या नशेमध्ये होती. अशावेळी 14व्या मजल्यावरून पाय घसरून ती खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती सीबीआय ने रिपोर्ट मध्ये दिली आहे. अभिनेता Sushant Singh Rajput यांच्या मृत्यूप्रकरणामध्येही दिशाच्या मृत्यूच्या लिंक्स तपासून पाहिल्या जात आहेत. दिशा ही 28 वर्षीय टॅलेंट मॅनेजर होती. तिने सुशांतप्रमाणेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले होते.

दिशाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांकडून दिशाच्या चारित्र्यावर अनेक उलट-सुलट आरोप करून त्यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील नाव रोवण्याचा प्रयत्न केला होता. पण आता सीबीआयकडूनच हा घातपात नसून अपघात असल्याचं सांगितलं जात आहे. दिशाच्या कुटुंबियांनी देखील तिच्या मृत्यूपश्चात त्यावरून सुरू असलेले राजकारण थांबवण्याची मागणी केली होती. हे देखील वाचा: 'Disha Salian चा बलात्कार आणि हत्येमध्ये राज्यातील एका मंत्र्याचा सहभाग, पुरावे असलेला पेन ड्राईव्ह CBI ला देणार'- Nitesh Rane (Watch Video).

8-9 2020 च्या रात्री मालाड मध्ये Galaxy Regent building च्या 14व्या मजल्यावरून दिशा खाली कोसळली. दिशाच्या निधनानंतर 5 दिवसांत सुशांतच्या निधनाने बॉलिवूड हळहळलं होतं.