व्हिडिओ: अभिनेत्री Diana Penty हिने Mumbai Fire Brigade, Mumbai Police यांचे मानले आभार
Diana Penty | Only representative and archived, edited images (Photo credit: ANI / File Photo)

बॉलीवुड अभिनेत्री डायना पेंटी (Diana Penty) हिने मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि मुंबई अग्निशमन विभाग (Mumbai Fire Brigade) यांचे आभार मानले आहेत. धन्यवाद, मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल असे म्हणत डायना पेंटी हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट लिहीली आहे. मुंबईतील माझगाव परिसरात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने दाखवलेली तत्परता पाहून डायना पेंटी प्रभावीत झाली. त्यामुळे तिने या दोन्ही विभागाचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री डायना पेंटी हिने बुधवारी (28 ऑगस्ट 2019) आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट लिहीली. ज्यात तिने मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले. या पोस्टमध्ये डायना पेंटी हिने माझगाव येथील आगीचा व्हिडिओही शेअर केला आहे.

Diana Penty ट्विट

दरम्यान ही आग मुंबईतील भायखळा (Byculla) परीसरातील लाकडाच्या वखारीला लागली आहे. या आगीत कोणतीही जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, लाकडाचे साहित्य आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमीक वृत्त आहे. संत सावंत मार्गावर ही लाकडाची वखार आहे. (हेही वाचा, भायखळा परिसरातील लाकडाच्या वखारीला भीषण आग; अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु)

एएनआय ट्विट

डायना पेंटी हिला डियाना पेंटी नावानेही ओळखले जाते. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2005 पासून डायना मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिने अनेक लोकप्रिय ब्रँडसाठी जाहिरात आणि फोटोशूट केले आहे. कॉकटेल हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात तिने ैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत काम केले होते.