Police Representative Image (Photo Credits: Instagram)

मुंबई (Mumbai) मध्ये 50 लाखाचे हिरे (Diamonds) घेऊन दोन किशोरवयीन मुलं पसार झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या पोलिस या मुलांच्या मागावर आहेत. खार मध्ये चोरी झालेल्या घरात ही मुलं 'हाऊस हेल्प' म्हणून काम करत होते. रीपोर्ट्सनुसार, या दोघांनी कुटुंबाला गुंगीचं औषध देत त्यांच्याकडील 50 लाखांचे हिरे लंपास केले.

Times of India च्या रिपोर्ट्सनुसार, या दोघांना कामाला ठेवणार्‍या महिलेच्या पतीचं महिन्याभरापूर्वी निधन झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खार मध्ये एका 3 मजली इमारती मध्ये राहते. दागिने बनवण्याचा तिचा व्यवसाय आहे. आरोपी मुलांची नावं राजा ( नीरज यादव) आणि शत्रुघ्न (राजू कुमार) आहे.

महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. महिलेने तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीत या आरोपी मुलांनी तिला 10 फेब्रुवारीला रात्रीचं जेवण 7 च्या सुमारास वाढलं. तिच्यासोबत तिची लेक, जाऊ आणि अजून एक महिला मदतनीस देखील जेवली. जेवणानंतर त्यांना कसंतरी होण्यास सुरू झाले म्हणून त्या 10.30 च्या सुमारास झोपल्या. घरात चार जणांना मळमळीचा त्रास झाल्याने त्यांनी उलट्या देखील केल्या. मात्र रात्री झोपल्यानंतर सकाळी 8 वाजता त्यांना जाग आली. चौघांनीही रूग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. उपचारानंतर त्या घरी आल्या. मात्र घरी परतल्यावर घरातले 50 लाखांचे अनकट डायमंड गायब असल्याचं त्यांना दिसलं. गुजरात येथे मुकबधिर असल्याचे नाटक करत भामट्याने पळवले 40 लाख रुपयांचे हिरे.

तक्रारदार महिला पोलिसांकडे गेली. घरात डायमंड्सची चोरी झाल्याची त्यांनी तक्रार नोंदवली. सध्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी एकापेक्षा अधिक टीम्स त्यांच्या मागावर पाठवल्या आहेत.