Tapan Patel Shirpur Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रसिद्ध उद्योगपती, धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर महापालिकेतील नगरसेवक तपन पटेल (Tapan Patel Dies in Mercedes Car Acciden) यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. ते 39 वर्षांचे होते. मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway ) हा अपघात बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. तपन पटेल (Tapan Patel) हे शिवसेना (Shiv Sena) माजी खासदार दिवंगत, मुकेश पटेल (Mukesh Patel) यांचे चिरंजीव आहेत. तपन पटेल यांच्या मर्सिडीज कार रस्ता दुभाजकाला धडकल्याने इंजिनाचा स्फोट झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

सावळदे (ता.शिरपूर) येथील NMIMS कॅम्पसमधून बाहेर पडताना हॉटेल गॅलेक्सी समोरच ही घटना घडली. सांगितले जात आहे की, हा स्फोट इतका भीषण होता की पटेल यांच्या कारचा जागी चक्काजूर झाला. अपघातात जखमी झालेल्या तपन पटेल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Gangster Firoz Ali Dies: यूपी पोलिसांची गाडी पलटी, मुंबईत पकडलेला गँगस्टर फिरोज अली जागीच ठार; Vikas Dubey Encounter प्रकरणाची पुनरावृत्ती?)

कोरोना व्हायर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींग नियमांचे पालन करत तपन पटेल यांच्यावर अंत्यविधी केले जाणार आहेत. आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या प्रांगणात हे अंत्यसंस्कार पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

तपन पटेल हे शिरपूर नगरपालिकेत नगरसेवक होते. नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून आले. त्यांना घरुनच राजकीय पार्श्वभूमी असल्याने अगदी कमी वयामध्ये त्यांना राजकीय जीवनात यशस्वी प्रवेश करता आला. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर ते कार्यरत होते.

तपन पटेल यांच्या पश्चातप श्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. तपन हे राज्यसभा माजी खासदार दिवंगत मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र, तर माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांचे ते पुतणे होते.