Gangster Firoz Ali Dies: यूपी पोलिसांची गाडी पलटी, मुंबईत पकडलेला गँगस्टर फिरोज अली जागीच ठार; Vikas Dubey Encounter प्रकरणाची पुनरावृत्ती?
Accident | Edited Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कुख्यात गैंगस्टर फिरोज अली (Gangster Firoz Ali) याच्या अपघाती मृत्यमुळे पुन्हा एकदा विकास दुबे एन्काउंटर प्रकरणाची लोकांना आठवण झाली आहे. फिरोज अली यास मुंबई येथील नालासोपारा झोपडपट्टीतून लखनऊ पोलिसांनी (Uttar Pradesh Police) अटक केली. उत्तर प्रदेश पोलीस ज्या वाहनातून फिरोज अली यास घेऊन निघाले होते त्या वाहनाला अपघात ( Car Accident) झाला. या अपघातात फिरोज अली याचा मृत्यू झाला. कानपूर एन्काउंटर प्रकरणातील आरोपी विकास दुबे (Vikas Dubey Encounter) याला घेऊन जात असलेल्या वाहनालाही असाच अपघात झाला होता. मात्र, तेव्हा पोलिसांसोबत त्याची चकमक झाल्याचे सांगण्यात आले होते.

प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गुना येथे पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. ज्यात फिरोज अली होता. उत्तर प्रदेश पोलीस मुंबई येथून पोलीस वाहनाने लखनूकडे निघाले होते. या वेळी या वाहनाला अपघात झाला. या अपघातात फिरोज अली याचा मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत असलेल्या एएसआयसह इतर चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. फिरोज अली हा मुंबई येथील नालासोपारा परिसरात लपला होता. (हेही वाचा,Encounter: 'गुन्हेगारांना संपविण्यासाठी एन्काउंटरचा वापर करु नका', उत्तर प्रदेश पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका )

कसा घडला अपघात?

उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाल्यने प्रसारमाध्यमांनी दिलेल्य वृत्तात म्हटले आहे की, फिरोज अली याला घेऊन निघालेल्या वाहनाची धडक निलगायसोबत झाली आणि अपघात घडला. हा अपघात इतका भायवह होता की, कारचे छत हवेत उडाले. पोलिसांनी पुढे सांगितलेकी, न्यायालयाने फिरोज अली याला अटक वॉरंट जारी केले होते.

गँगस्टर विकास दुबे याचाही अपघाती मृत्यू

देशभरात चर्चेचा आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कानपूर एन्काउंटर प्रकरणातील आरोपी विकास दुबे याचाही मृत्यू असाच झाला होता.मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यात आले. उत्तर प्रदेशवरुन मध्यप्रदेशमध्ये घेऊन येत असताना कानपूरकडे रवाना होत असताना पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातावेळी विकास दुबे याने पळून जाण्याच प्रयत्न केला. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाला. फिरोज अली याच्या अपघाती मृत्यूमुळे पुन्हा एकदा विकास दुबे एन्काऊंटर प्रकरण चर्चेत आले आहे.