BTS Group News: मोबाईल सतत पाहण्यातून मिळालेली माहिती, त्यातून निर्माण झालेली क्रेझ आणि त्याच्या पूर्ततेसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीन मुलींनी उचललेले पाऊल पाहून धाराशिव पोलिसही (Dharashiv Police) चक्रावले आहेत. घटना आहे धराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील उमगरा (Umarga) तालुक्यातील. येथील तीन अल्पवयीन मुलींना (Minor Girls) दक्षिण कोरियातील BTS बँड (South Korean Boy Band) बद्दल माहिती मिळाली. या बँडला भेटण्यासाठी घरातील 5,000 रुपये घेऊन घरातून पलायन करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे कोणालाही संशय येऊ नये यासाठी या तिघींनी आपल्या अपहरणाचा बनाव (Fake Kidnapping) रचला. तिन्ही मुली अल्पवयीन असून, त्यापैकी दोघी 11 तर एक 13 वर्षांची आहे. इतक्या कमी वयातील मुलींमध्ये असलेली क्रेझ आणि त्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. अर्थात, या तिघींचाही प्लॅन अवघ्या 30 मिनिटांमध्ये उघडकीस आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पालकांकडे सूपूर्त केले.
काय आहे BTS बँड?
जभभर BTS बँड नावाने प्रसिद्ध असलेला हा एक कलाकार तरुणांचा समूह आहे. ज्याला बंगटान बॉईज म्हणूनही ओळखले जाते. हा समूह अर्थातच बँड सन 2010 मध्ये स्थापन झाला. हा एक दक्षिण कोरियन बॉय बँड आहे. ज्यामध्ये जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमीन, व्ही आणि जंगकूक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. हे सर्वजण संगित कार्यक्रमासाठी लेखण, निर्मिती आणि सादरीकरण करतात. या बँडची जगभरामध्ये क्रेझ आहे. त्यांनी आपल्या कलेतून अनेकांना वेड लावले आहे. पण हे वेड धाराशिव तालुक्यासारख्या ग्रामिण भागात पोहोचले असेल आणि त्यातही ते इतक्या लहान मुलींमध्ये असेल याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे या मुलींनी या बँडला बेटण्यासाठी उचललेले टोकाचे पाऊल पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (हेही पाहा, वाचा: Alka Yagnik : BTS ला मागे टाकत अलका याज्ञिकने रचला नवा रेकॉर्ड, जाणून घ्या सविस्तर माहिती )
नेमकं घडलं काय?
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तीन अल्पवयीन मुली बीटीएस बँडच्या चाहत्या होत्या. या बँडमधील कलाकारांना भेटण्यासाठी त्यांच्या मनात इतकी तीव्र इच्छा निर्माण झाली की, त्यांनी त्यासाठी चक्क एक प्लॅन आखला. त्यासाठी त्यांनी चक्क आपल्याच अपहणाचा बनाव रचला. तो त्यांनी अंमलातही आणला. त्यांनी आपल्या घरातील 5000 रुपये घेतले आणि घरापासून काही अंतर दूर गेल्यावर त्यांनी घरातल्यांना संदेश दिला. आमच्या गळ्याला चाकू लावून आमचे अपहरण करण्यात आले आहे. सहाजिकच कुटुंबीयांची भीतीने गाळण उडाली आणि त्यांची पाचावर धारण बसली. कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला असता, पोलिसांकडून अवघ्या 30 मिनीटात उलघडा केला आणि या तिघींनाही ताब्यात घेतले. (हेही वाचा, Dharashiv: धाराशिव येथील शाळेत आयर्न-फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खाल्ल्याने 19 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; बाधित विद्यार्थी रुग्णालयात दाखल)
दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन
विशेष उल्लेख करुन सांगायचे असे की, या तिन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोघी केवळ 11 तर एक 13 वर्षांची आहे. या तिघींनीही घरातून पाळल्यावर पुण्याला जायचे आणि तेथून पुढे दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन आखला होता. ठरलेला प्लॅन त्यांनी अंमलातही आणला. त्या घरातून पळाल्या आणि पुण्याच्या दिशेने निघाल्यासुद्धा. पण, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. (हेही वाचा, Shah Rukh Khan चं 'दिवाळी' निमित्त जाहिरातीच्या शूटिंगचे BTS क्षण वायरल)
घरातून पळालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी उमरगा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबविले. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या ऑपरेशनमध्ये एवघ्या 30 मिनिटांत मुलींची सुटका करण्यात आली असली तरी, मुलींनी उचललेले पाऊल पाहता आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, तिन्ही मुली कोरियातील BTS-V ह्या कोरियन सिंगर व डान्स ग्रुपच्या फॅन होत्या. त्यांची क्रेझ इतकी प्रचंड होती की, काहीही झाले तरी आपण या बँडला भेटायचेच असा चंग बांधून या मुली निघाल्या होत्या. अशा घटना दुर्मिळ असल्या तरी, पालकांनी आपली मुले मोबाईल वापरत असताना काळजी घेणे गरजेचे आहे. आपली मुले काय पाहतात, कोणाला फॉलो करतात, त्यांच्यावर कोणत्या विचारांचा पगडा आहे याबाबत पालकांनी दक्ष असणे गरजेचे असल्याचेही पोलिसांनी सांगितले.