Dhananjay Munde Allegation Case: धनंजय मुंडे यांच्यावरी आरोप प्रकरणात महिलेने माघार घेतल्याचे वृत्त, ट्विट करुन दिली माहिती
Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे वातावरण ढवळून निघाले असतानाच या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे. ज्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले त्याच महिलेने आता माघार घेतल्याचे वृत्त (Dhananjay Munde Allegation Case) आहे. संबंधित महिलेने ट्विटरद्वारे पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, ज्या ट्विटर हँडलवरुन संबंधित महिलेने ट्विट केले आहे ते ट्विट अधिकृत असल्याची माहिती नाही. परंतू, याच ट्विटर हँडलवरुन या आधी मुंडे यांच्यावर केलेले आरोप आणि त्याबाबत केलेल्या तक्रारीची पोस्ट मुंबई, धनंजय मुंडे, शरद पवार, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यावर राज्यातील विरोधी पक्ष भाजपा जोरदार आक्रमक झाला होता. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. हे सर्व सुरु असतानाच भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केलेल्या तक्रारीमुळे कहाणीत ट्विट्स आला. कृष्णा हेगडे यांनी संंधित महिलेविरोधात ब्लॅकमेल केल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनीही संबंधित महिलेने आपल्याला ब्लॅकमेल केल्याचे म्हटले. तसेच, यासंदर्भात आपण पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही म्हणाले. इतकेच नव्हे तर जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्यानेही या महिलेने आपल्याला ब्लॅकमेल केल्याचे म्हटले. त्यामुळे या प्रकरणाती गुंतागुंत मोठ्या प्रमाणावर वाढली. अखेर संबंधित महिलेने ट्विट करत आपण माघार घेत असल्याचे म्हटले आहे. हेदेखील वाचा- Sharad Pawar on Dhananjay Munde: सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही- शरद पवार

संबंधित महिलेने ट्विटमध्ये काय म्हटले?

@renusharma018 या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत संबंधित महिलेने म्हटले आहे की, ''एक काम करा आपण सर्वजण मिळून निर्णय घ्या. काहीही माहिती नसताना आप सर्वजण आणि जे मला ओळखतात तेही जर चुकीचे आरोप लावत आहेत तर आपण सर्वजण मिळून निश्चित करा. मी स्वत: माघार घेते. जशी आपली सर्वांची इच्छा आहे.''

@renusharma018 या ट्विटर हँडलवरुन दुसऱ्या ट्विटमध्ये संबंधित महिलेने म्हटले आहे की, ''जर मी चुकीची आहे तर इतके लोक आतापर्यंत माझ्याबद्दल बोलायला का नाही आले. मी माघारा घेत असले तरीही मरा गर्व आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी सर्वांसोबत लढत आहे. मला खाली दाखवण्यासाठी इतक्या सगळ्या लोकांना एकत्र यावे लागले.मी माघार घेते आहे तुम्हाला जे लिहायचे ते लिहा. ''

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या घरी पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया पुढे आली आहे की, जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही.