मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) आल्या असताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवसास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्याचवरुन आता भाजप (BJP) नेते दोघांवरही जोरदार टीका करत आहे. याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रसार माध्यमांशी बोलत आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसला (Congress) बाजू ठेवून ममता बॅनर्जी सत्तेची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहे. शरद पवार यांची त्यांना साथ असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ममता दीदी थेट बोलणाऱ्या आहेत. तर पवार साहेब बिटवीन द लाईन बोलणारे आहेत. दोघांचं बोलणं एकच आहे. दोघांना काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे. इतरांना सोबत घ्यायचं आहे. ममता दीदी गोव्यात आणि नॉर्थ ईस्टमध्ये का बरं लढत आहेत? एवढ्याचसाठी की त्यांना वाटत काँग्रेस नाही आम्हीच आहोत हे सांगायचं आहे. काँग्रसे संपली आहे. आम्हीच खरी काँग्रेस आहोत हे त्यांच्या पक्षाचं स्टेटमेंटच आहे. त्या सर्व मताला पवारांचं समर्थन आहे. पवारांचं मत हे पहिल्या दिवसापासून आहे. फक्त राज्यातील परिस्थिती त्यांना अनुकूल नाहीये. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Tweet
ममता बॅनर्जी जी यांचा महाराष्ट्र दौरा उद्योगांसाठी कमी आणि विरोधक गोळा करण्यासाठी अधिक!
असाच प्रयत्न 2019 मध्येही झाला आणि अपयशी ठरला. 2024 मध्येही त्याचीच पुनरावृत्ती होईल!
काँग्रेससह आघाडी की काँग्रेसशिवाय, हा त्यांचा आपसातील सामना तर आधी संपू द्या!
मुंबईत माध्यमांशी संवाद... pic.twitter.com/UaHYUcnrdU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 2, 2021
2024 मध्येही मोदींजीच सरकार - देवेंद्र फडणवीस
'मला असं वाटतं ममता दीदींच्या कालच्या दौऱ्याचा मूळ अजेंडा हा राजकीय होता. आपण जर सगळ्यांनी बघितलं असेल एक तर सगळ्यांनी मान्य केलं असेल की, 2024 साली देखील मोदीजींचं सरकार असणार आहे. म्हणून आता त्यांना हरविण्याकरता काय रणनिती करता येईल याकरता खलबतं चालली आहेत. त्यामुळे सगळ्यानां एकत्र घेवुन येणे हा प्रयोग त्यांचा चालु आहे. पण एकत्र येण्याचे प्रयोग 2019 साली देखील झाले पण त्या प्रयोगांना यश आलं नाही. लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला. 2024 साली देखील लोकं पुन्हा एकदा मोदींवरच विश्वास ठेवतील. पण या सगळ्या यांच्या भानगडींमध्ये एक मात्र लक्षात येतंय की, आता काँग्रेसला बाजूला ठेवून नॉन-काँग्रेसविरोधी पक्षाची आघाडी करण्याचा प्रयत्न हा ममता दीदी करत आहेत आणि पवार साहेबांची त्याला साथ दिसते आहे. ( हे ही वाचा Ashok Chavan on Mamata Banerjee: काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ, उंटासारखी तिरकी, घोड्यासारखी अडीच घरं नव्हे; अशोक चव्हाण यांच्याकडून विलासराव देशमुख यांचा व्हिडिओ ट्विट.)
शिवसेनेवर टीका
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकर यांच्याबाबतीत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे आज शिवसेनेचे खासदार हे सावरकरांचा अपमान करत असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेनेचे सावरकर प्रेम किती बेगडी आहे हे सुद्धा समोर आले आहे असेही फडणवीस यांनी म्हणले आहे. निवडणुकीत शिवसेनेने आपला विजयी होण्याचा स्ट्राइक रेट पाहावा आणि महाराष्ट्रातुन जनतेने कोणाला पळवून लावले हे निवडणुकीत दिसले. आता पुढील निवडणुकीतही दिसून येईल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.