Ayodhya राम मंदिरासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख एक रुपयांची देणगी
Devendra Fadnavis give cheque for Ayodhya Ram Mandir (Photo Credits: Twitter/ANI)

तमाम भारतवासिय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस त्यांना याच जन्मी पाहायला मिळणार आहे तो म्हणजे अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांचे (Ayodhya Ram Mandir) भव्य मंदिर... या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर या मंदिराचे काम जलद वेगाने सुरु आहे. त्यासाठी देशातील करोडो लोक आपापल्य परीने या मंदिराच्या पायाभरणीसाठी देणगी देत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या अभियानाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी देखील या राममंदिरासाठी देणगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख एक रुपयाची देणगी दिली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज एक छोटा कार्यक्रम झाला. जेथे फडणवीसांनी सपत्नीक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांना एक लाख एक रुपयांचा धनादेश दिला.हेदेखील वाचा- Raj Thackeray 1-9 मार्च दरम्यान एकदिवसीय अयोद्धा दौर्‍यावर, आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा प्लॅन तयार

दरम्यान श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार असून 12 कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या वर्गणी अभियानातून जमा झालेल्या निधीतून अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारण्याचा मानस ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये अशा स्वरुपात वर्गणी गोळा करण्यात येत असून वर्गणी दिलेल्यांना त्याची पावती तसेच मंदिर आणि भगवान रामाचे एक चित्र देण्यात येणार आहे.