PM Modi, Devendra Fadnavis (फोटो सौजन्य - ANI)

PM Modi Successor: शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या दाव्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकारीबद्दल देशभरात चर्चा रंगल्या आहेत. परंतु, आता यावररी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या उत्तराधिकारीबद्दल (Successor) च्या अटकळांना फेटाळून लावत, मोदी पुढील अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करत राहतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं की, '2029 मध्ये, आपण मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहू. उत्तराधिकारावर चर्चा करण्याची गरज नाही. आपल्या संस्कृतीत, नेता सक्रिय असताना उत्तराधिकाराबद्दल बोलणे अयोग्य आहे. ती मुघल संस्कृती आहे. त्यावर चर्चा करण्याची वेळ आलेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Aurangzeb's Tomb Row: 'औरंगजेबाची कबर हे एक संरक्षित स्थळ, ती हटवता येणार नाही, मात्र त्याचे उद्दात्तीकरण होता कामा नये'; CM Devendra Fadnavis यांनी स्पष्ट केली भूमिका (Video))

सोमवारी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी असा दावा केला की, आरएसएस देशाच्या राजकीय नेतृत्वात बदल घडवून आणत आहे. ते (मोदी) कदाचित सप्टेंबरमध्ये निवृत्तीचा अर्ज लिहिण्यासाठी आरएसएस मुख्यालयात गेले असतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तथापि, ज्येष्ठ संघ नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनीही या अटकळीला नकार देत म्हटले आहे की, 'मला उत्तराधिकाऱ्यांबद्दल कोणतीही चर्चा झाल्याची माहिती नाही.'