BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

आम्हाला खरचं आनंद आहे जर कोणी म्हणत असेल की, चांगलं काम करणारे सर्वचं जण भाजपचे आहेत, असं शिवसेनेला वाटत असेल, तर त्यांचे आभार, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) आपल्या प्रेरणेने लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासोबत रविवारी जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही, अशी तक्रार येता कामा नये; राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुचना)

गेल्या अनेक दिवसांपासून सोनू सूद देशातील स्थलांतरित मजूरांना घरी पोहोचवण्याचं काम करत आहे. त्याच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु, संजय राऊत यांनी सोनू सूद यांच्या सामाजिक कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी सोनू सूद चा उल्लेख 'महात्मा सोनू' असा केला आहे. तसचं सोनू सूद च्या चांगल्या कामांमागे कोणीतरी राजकीय दिग्दर्शक असल्याचंही राऊत यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, रविवारी सोनू सूदने रात्री उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत यांनी ‘अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले जय महाराष्ट्र,’ अशा शब्दांत टोला लगावला होता.