Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Nitesh Rane (PC - PTI and Twitter)

MPSC 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांकडून लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. पुणे, कोल्हापूर, जळगाव जिल्ह्यात MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली आहे. (वाचा - MPSC 2020 पूर्वपरीक्षा अचानक रद्द झाल्याने पुण्यात विद्यार्थी आक्रमक; आमदार रोहित पवार, सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांची कोरोना प्रतिबंधक नियम पाळत परीक्षा घेण्याची सरकारकडे मागणी)

देवेंद्र फडणवीस ट्विट-  

याशिवाय भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. या सरकार मध्ये जरा देखील समन्वय आढळून येत नाही. त्यामुळेच ही गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे. प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी 2 ते 3 वर्ष प्रयत्न करत असतो.त्याच्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरणे स्वाभाविक असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सरकारी नोकऱ्यांची वयोमर्यादा 2 वर्ष वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील आपल्या ट्विटर हँडलवरून महाविकास आघाडी सरकारला सवाल केला आहे. यात नितेश राणे यांनी त्यांनी लिहिलं आहे की, 'MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? ह्यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून.. वाटेल ते निर्णय घेत आहेत!!! फक्त MPSC परिक्षेमध्येचं कोरोना होणार.. रात्री च्या पार्टी मध्ये नाही ?? असा प्रश्नही नितेश राणे यांनी विचारला आहे.