अरे बाबांनो कसली चौकशी करता आणि कोणाची करता. जागा आहे तिथंच आहे. सगळे पोलीस अधिकारीही जाऊन पाहून आले आहेत. मग कसली चौकशी करता? असा प्रतिप्रश्न करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिष्कीलपणे आपल्यावरील आरोपांचे खंडण करत प्रत्युत्तर दिले आहे. माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar book) यांनी पुस्तकात केलेल्या आरोपांवर प्रसारमाध्यमांतन बातम्या आल्या होत्या. त्याचे खंडण करताना अजित पवार यांनी आपल्यावरीस सर्व आरोप फेटाळून लावले. फुले वाड्याबाबत मु्ंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय दिला आहे. याची माहिती देताना आयजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, महात्मा फुले यांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व्हावे अशी भूमिका राज्य सरकारने 2015 आणि 2018 ला राज्य सरकारने मांडली होती. ते स्मारक लवकर पूर्ण व्हावी ही आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, पाठीमागील दोन तीन दिवसापासून एका माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला देत प्रसारमाध्यमांतून बातम्या येत आहेत. परंतू, त्या बातम्यांचा आणि माझा दुरान्वयेही संबंध नाही. खरे तर मी भला आणि माझे काम भले. कोणी काही टीका टिपण्णी केली तर त्याकडे लक्ष द्यायचे नाही, असा माझा पवित्रा असतो. परंतू, प्रसारमाध्यमांनी काही गोष्टी अधिकच लिहील्या आहेत, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. येरवडा पोलीस स्टेशन परिसर विकास प्राधिकरण प्रकरमी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी यांच्या आरोपाच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचे खंडण केले. माझ्यावरील आरोपांना मी फारसे महत्त्व देत नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यन, प्रसारमाध्यमांतील बातम्यांमध्ये ज्या भूखंडाचा उल्लेख आहे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. दुसरे म्हणजे ती जी काही कारवाई करण्यात आली ती तत्कालीन गृहमंत्रालयाने काढलेल्या जीआरनुसारच झाली आहे. प्रकरण पुढे आल्यानंतर त्यासंदर्भातील कागदपत्रे मी स्वत: पाहिली आहेत. अर्थात पुण्याचा पालकमंत्री मी प्रदीर्घ काळ राहिल्याने काही लोकांना वाटते, पुण्यातील सगळ्याच गोष्टींशी माझा संबंध आहे. पण तसे नसते असेही ते म्हणाले.
माझ्याकडे ज्याज्या विभागाचा कारभार आला त्यातील कोणत्याही अधिकाऱ्याला विचारा. मी स्वभावाने कितीही कडक असलो तरी, कोणालाही चुकीच्या पद्धतीने बोलत नाही. माझ्या मंत्रालात मी बदल्यांचेही अधिकार माझ्याकडे घेत नाही. मी ते अधिकार आयुक्तांनाच देतो. इतकेच नव्हे तर माझे त्यांना इतकेच म्हणे असते की, राज्याचा महसूल कसा वाढेल त्याकडे बारकाईने पाहा इतकेच मी त्यांना सांगत असतो असे ते म्हणाले.