Dengue (Photo Credit - Pixabay)

Dengue Threat Rises In Mumbai: पावसामुळे मुंबईत पुन्हा एकदा डेंग्यूचा धोका वाढत (Dengue Risk Increases in Mumbai) आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ताज्या अहवालानुसार, झोपडपट्ट्या भागात जवळजवळ 60 टक्के डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळली आहेत. तसेच 40 टक्के डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे इमारती आणि उंच इमारतींच्या निवासी सोसायट्यांमध्ये आढळली आहेत. एकूण, बीएमसीच्या कीटकनाशक विभागाने शहरातील 24 वॉर्डांमधील 27 हजार ठिकाणी उत्पत्तीची ठिकाणे ओळखली आहेत.

दरम्यान, BMC अधिकाऱ्यांनी या ठिकाणांना नष्ट करण्यासाठी तातडीने पावले उचलल्याचा दावा केला असला तरी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डेंग्यू हा एडिस एजिप्टी डासाच्या चाव्याव्दारे पसरणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. डेंग्यू झाल्यास उच्च ताप, डोकेदुखी, डोळ्यांमागील वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, पुरळ आणि उलट्या अशी लक्षणे दिसून येतात. (हेही वाचा - Maharashtra Rain Alert: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता)

तथापी, गंभीर प्रकरणांमध्ये, प्लेटलेट काउंटमध्ये झपाट्याने घट होऊ शकते. या प्रसाराला आळा घालण्यासाठी, बीएमसीच्या कीटकनाशक विभागाने 51 हजार हून अधिक इमारती आणि अंदाजे 8.37 लाख घरांमध्ये फॉगिंग आणि अँटी-लार्व्हल फवारणी केली आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात देखरेख आणि नियंत्रण कार्यात अडथळा येत आहे.